Próximos conciertos de Usha Mangeshkar
Canciones más populares de Usha Mangeshkar
Créditos
PERFORMING ARTISTS
Usha Mangeshkar
Performer
COMPOSITION & LYRICS
Ram Kadam
Composer
Jagdish Khebudkar
Songwriter
Letras
तुम्हावर केली मी मर्जी बहाल
नका सोडून जाऊ रंगमहाल
नका सोडून जाऊ रंगमहाल
पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती
पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती
ही नजर उधळीते काळजातली पिरती
ही नजर उधळीते काळजातली पिरती
जवळी यावं, मला पुसावं गुपित माझं खुशाल
—गुपित माझं खुशाल
तुम्हावर केली मी मर्जी बहाल
नका सोडून जाऊ रंगमहाल
हुरहूर म्हणू की ओढ म्हणू ही गोड
हुरहूर म्हणू की ओढ म्हणू ही गोड
या बसा मंचकी सुटल गुलाबी कोडं
विरह जाळीता मला रात ही पसरी माया जाल
—पसरी माया जाल
तुम्हावर केली मी मर्जी बहाल
नका सोडून जाऊ रंगमहाल
लाडे-लाडे अदबीनं तुम्हा विनवते बाई
लाडे-लाडे अदबीनं तुम्हा विनवते बाई
पिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या पायी
पिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या पायी
अशीच रहावी रात, साजणा, कधी न व्हावी सकाळ
—कधी न व्हावी सकाळ
तुम्हावर केली मी मर्जी बहाल
नका सोडून जाऊ रंगमहाल
नका सोडून जाऊ रंगमहाल
Writer(s): Ram Kadam, Jagdish Khebudkar
Lyrics powered by www.musixmatch.com