Lyrics

विघ्नहर्ता, सुखकर्ता तूचि दयाघना करी भक्ती, दे शक्ती, बाप्पा गजानना (विघ्नहर्ता, सुखकर्ता तूचि दयाघना) (करी भक्ती, दे शक्ती, बाप्पा गजानना) दरवर्षाला पुरी होती दरिद्री घरी सुखाने औंदा आता लोळतो गादीवरी मुलांचा भार जरी असता डोईवरी बायको ही दिसते बघा जशी इंद्राची परी, हो अशी किमया, शिवतनया, तुमची जनार्दना करी भक्ती, दे शक्ती, बाप्पा गजानना (विघ्नहर्ता, सुखकर्ता तूचि दयाघना) (करी भक्ती, दे शक्ती, बाप्पा गजानना) सुखाचा मार्ग भला, जाहला आता खुला धन मिळवावे कसे शिकलो सर्व कला तुझ्या दर चतुर्थीला होतो आनंद मला आरती गाऊनिया नमीतो आज तुला, हो दुःख जळते, सुख मिळते करिता उपासना करी भक्ती, दे शक्ती, बाप्पा गजानना (विघ्नहर्ता, सुखकर्ता तूचि दयाघना) (करी भक्ती, दे शक्ती, बाप्पा गजानना)
Writer(s): Madhurkar Pathak, Harendra Hiraman Jadhav Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out